भारतीय स्वातंत्र्या
भारतीय स्वातंत्र्या
चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्या
स्वातंत्र्य मिळाले देशाला
प्रत्येक माणूस गौरवाने
देतो सलामी स्वातंत्र्य दिनाला
गुलामीचे दीडशे वर्षे
भोगल्या किती यातना आम्ही
नव्हता शिक्षणाचा अधिकार
नव्हती स्वातंत्र्याची हमी
नाकारले जे होते आमचे
अधिकार जीवन जगण्याचे
पशुहूनी हिन होते याच देशात
जीवन आम्हा मानवांचे
जातीयतेचा डोंगर होता
चढलेला उंच शिखरावर
अन्याय अत्याचार केले
किती माणसाने माणसावर
स्वातंत्र्य मिळाले देशाला
माणूस माणसात आला
धन्य ते थोर स्वातंत्र्य सेनानी
दिले स्वातंत्र्य मिळवून आम्हाला
राहो असेच अबाधित
स्वातंत्र्य भारताचे
पुन्हा न येवो नशिबी
ते दिवस गुलामगिरीचे
