STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

भारताचे संविधान

भारताचे संविधान

1 min
504

घेऊन हाती लेखणी

रचला असामान्य इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राज्य घटनेचे शिल्पकार


शिल्प असे हे अद्भुत

जगी नाही तोड तयास

न्याय, हक्क, स्वातंत्र्य, समता

'देण' संविधानाची मानवास


हुकूमशाहीचे तुकडे करून

जन्म घेई लोकशाही

अधिकारांची झाली जाण

प्रजातंत्र देते ग्वाही


आखून दिली लक्ष्मणरेषा

वर्तनाच्या मर्यादेची

कायद्याची चौकट घालून

ज्योत प्रज्वलली नितीमत्तेची


सर्वधर्मसहिष्णुता, धर्मनिरपेक्षता

अखंड अबाधित भारताची एकता

एकसंघ होऊनी निर्मिली बंधुता

कडेलोट केली, आम्ही अस्पृश्यता


देशाचा श्वास आहे

भारताचे संविधान

आम्ही आहोत भारतीय

सार्थ मला त्याचा अभिमान


Rate this content
Log in