भारत
भारत
1 min
186
काय बोलावे मम देशावर
महिमा अघाध गनराज्याचा
विविधता एकता समतोल
अभिमान मजला भारताचा
ध्वज तिरंगा फडकला
शान मधे देशाचा
प्रतीके रंग ह्याचे
बोध होतो वचनाचा
चिन्ह अशोक चक्र
सत्याची करते घोषणा
ब्रीद वाक्य मार्ग दाखवते
देशसेवा करा सांगते मना
राष्ट्रगान गुणगान महान
अंतःकरनातूंन गुणगुणते
गर्व भारतभूचा आम्हा
कौतुकाने मान ही उंचावते
राजधानी ह्याची दिल्ली
मोठे मुंबईमहा शहर
किल्ला लाल शोभतो
झगमगते स्वप्न नगर
