STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

भारत

भारत

1 min
452

भारताचा मुकुट शोभे

हिमालय उत्तुंग हा

करी रक्षण भारताचे

ताठ मानेने उभा


काश्मीर असे स्वर्ग

बोलत नाही खोटं

जपूया सुंदरता

नको गालबोट


पंजाबचे पुत्तर 

देशासाठी प्राण त्यागती

लस्सी नि पराठ्याची चव

जिभेवर रेंगाळती


आग्र्याचा ताजमहाल

आश्चर्य असे एक 

परदेशी पर्यटकही

भेट देती अनेक


सरदार पटेलांनी 

योगदान दिले देशाला

गुजरातमध्ये नमन 

करा त्यांच्या पुतळ्याला 


महाराष्ट्र आमुचा न्यारा

इथली लज्जत न्यारी 

हिमालयाला वाचवायला 

उभा सह्याद्री 


दक्षिण भारताचा विकास

होई झपाट्याने

विज्ञान तंत्रज्ञानात 

मजल मारली भारताने 


बंगालची गोडी

रसगुल्ल्यात दिसते 

कवी टागोरांचे जन्मस्थान

साऱ्यांना भावते 


ईशान्य भारत आग्नेय भारत

आपलेसे वाटतात

नैऋत्य भारत वायव्य भारत

सुंदर भासतात 


जगात ह्या भारत

असा देश आहे

प्रत्येक राज्यात जिथे

विविधता नांदे


सलाम या भारताला

करूया मनापासून

करूया महान याला

सुरुवात आपल्यापासून 


Rate this content
Log in