भारत माझा देश..!
भारत माझा देश..!
1 min
434
सत्यमेव जयते ब्रीदाचा
आपला देश महान
विश्वात सर्वदूर ज्याची
एक वेगळीच शान
बारा पगड जाती
अनेक धर्मांची खाण
तरीही साहिष्णुतेला
इथे नाही काही वाण
मानवतेच्या कुशीत
वसते एकोप्याची जाण
एकदिलाने इथे नांदतो
लोकशाहीचा प्राण
श्रद्धेची अन भक्तीची
आत्मिक गंगा वाहते महान
अंतरात वसते सदैव इथे
आपल्या देशाची जान
मी महान माझा देश महान
गाऊ देशाचे गौरव गान
उन्नत उज्वल प्रगती करुनी
वाढवू देशाचा जगी मान!!!!
