भारत देशा
भारत देशा
अदभुत संस्कृतिचे संमिश्रण,
भारत देशाला लाभले वरदान.
समृध्द हड्डपा संस्कृतिचे उत्खनन,
जगाला आम्हीच घडविले दर्शन.
महावीर,बुध्द, सम्राट अशोक महान,
संपुर्ण जगाला शिकवले तत्वज्ञान.
ऋषिमुणी,संत व युगपुरुषांची,
भारत देशच एकमात्र जनु खान.
अनेक गुरुकुल, विश्र्वविदालय प्राचिन,
होते सर्वांना साठी शिक्षण स्थान.
विश्र्वाच्या कोण्या-कोपर-यातुन,
शिष्य घेवुन गेले अफाट ज्ञान.
सुख शांती,समृध्दी अहिंसा, नाय,
त्याग,समानता आहे संस्कृतिचे वचन.
मानवता व मानवचे फक्त कल्याण,
सापडे याच संस्कृतिमध्ये समाधान.
देशावर झाले कित्येक परकिय आक्रमण,
परकियच संस्कृतिमध्ये झाले विलीन.
विविधता मध्ये एकता आमची शान,
देशाच्या आब्रुसाठी सर्वंच देतात प्राण.
कोरोना महामरित रचले किर्तिमान,
संपूर्ण जगाले केले मनपूर्वक औषधीदान.
आमच्याच सारखे अन्य कां नाही महान ?,
कां आम्हीच नेहमी भागवावी जगाची तहान?.
