भारत देश
भारत देश
1 min
379
भारत देश
देश हा विविधतेचा
विविध लोकांचा
नि संस्कृतींचा
म्हटले जाते आहे
विविधतेमध्ये एकता
येता वाईट प्रसंग
का पडे माणूस एकटा
जातींवरुन राजकारण
आहे नेहमीचेच
दंगली नि तंटे
नुकसान साऱ्यांचे
घडवायला आपला
भारत महान
हवी जिद्द नि
कष्टाची तहान
येऊ सारे एकत्र
करू संकटावर मात
करू भारत मोठा
सगळे एकसाथ
