भारत देश माझा महान
भारत देश माझा महान
तीन रंगाचा तिरंगा भारत देशाचा शान
मान सन्मानपूर्वक बाळगू तिरंगाचा अभिमान
या देशाचे नागरिक आहोत सारेच ठेऊ याचे भान
सुख,समृद्धी आणि शांततेची देशाला देऊ दान
जाती धर्मातील विविधतेचा मनातून काढून टाकू घान
प्रेम,आपुलकी ,एकतेने उजळून टाकू देशाचे रान
सर्वांच्याच मनात जागऊ मातृभुमीची लळा
एकजुटीने मिळून कापू दुश्मन देशाचे गळा
स्त्री पुरुष भेदभावाला आपण आळा घालू
आपण एक वचनाणे स्त्री भ्रूण हत्या टाळू
कुळ,धर्म, जात, पंत या गोष्टींना जाळू
फक्त भारतीय नागरिकत्व आपण पाळू
सण उत्सव या परंपरेतून शिकू एकतेची भाषा
जागवू मनात आपल्या देशभक्तीची नशा
पक्षा पक्षातील भांडणात सांडू नका रक्त
फक्त देशाच्या हितासाठी करु कानून सक्त
देश सेवेसाठी झटणारे आहेत इथे अनेक देशभक्त
अनेक संघर्षातून देश करु मुक्त
गरीब श्रीमंती असे भाव मिळून करु नाश
जे तरसत आहेत अन्नासाठी त्यांना भरवू प्रेमाचा घास
भारत देश आहे माझा खरचं महान
देश रक्षणासाठी अहोरात्र लढतो देशाचा जवान
देशातील संविधानाचा करु पुरेपूर अभ्यास
चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य एकच बाळगू मनी ध्यास
