भारलेला जन्म हा
भारलेला जन्म हा
भारावलेले शब्द माझे
भारलेला जन्म हा
डोकावुनी अंतरी माझ्या
एकदाच वेड्या पहा.......
भारलेले ऋतू सारे
वृक्षवेली सजल्या अहा!
गीत गाती पाखरेही
एकदाच ऐकून पहा.....
दऱ्याखोऱ्या काट्यामधुनी
नदी वाहते कशी पहा
आस सागरा भेटण्याची
भारावलेली नदी पहा.....
प्रीत वेड्या भुंग्यास वाटते
कसा गुंजारव करी पहा
कमलीनीमध्ये बंदीस्त रातभर
प्रीत भुंग्याची तू पहा.....
नसे एकला चंद्र आकाशी
भोवती चांदण्या पहा
भारलेले आकाश सारे
डोळे उघडूनी पहा...
जग सारेच भारलेले
भारलेला जन्म हा
धुंदीत जगतो निसर्ग सारा
आनंद लुटूनी देत राहा....
