बहाणा
बहाणा
1 min
250
आता फक्त आठवणीत,
मागे राहिलास तू,
माझ्या कवितेच्या शब्दामध्ये
नकळत् उलगडत् गेलास तू,
सोपे नव्हते मला अस ,
अलगद तुला पकड़ण.
आता ही नाही जमत,
तुला मनासारख शब्दात बांधन्,
तू होतासच तसा,
मनमौजी,स्वछंदी हसतमुख.
थोड्याश्या तुझ्या सहवासात,
अमाप देवून गेलास तू सुख.
जगू पाहतेय रे पुन्हा त्या ,
भुतकाळातील आठवणी.
लिहावी वाटते तुझ्या वर
एक न संपणारी कहानी.
मग सांग ना येशील का मला,
हवा तसा माझ्या कवितेमध्ये.
तेवढेच पुन्हा चांदणे पडतील,
माझ्या पदरा मध्ये.
नाही येणार तू, कारण तुला वाटेल हा निव्वळ माझा वेडेपणा.
आता आलास पुन्हा माझ्या जवळ,
तर नाही मिळणार, तुला परतन्याचा बहाणा,,, !!
