STORYMIRROR
भान
भान
भान
भान
असू द्यावे भान गड्या
आपल्याच वर्तनाचे
जावी जोडत माणसे
बंध पेरत शब्दांचे
नको शब्दच विखारी
दुंभगण्या सारे मन
शिंपडावे रे अमृत
शब्द जाणूनिया घन
भान असावे नेहमी
इतरास जपतांना
पाझरेल झरा हृदयी
भाव निर्मळ होतांना
More marathi poem from Dilip Yashwant Jane
Download StoryMirror App