भाकरीची ओढ
भाकरीची ओढ
1 min
402
दिनरात राबतीया
माझी माय जीवनात
पोटा चिमटा घेऊन
करी जीवनी हो मात
कष्ट करुनिया हाती
भरवते दोन घास
माय तुझ्या हाताला ग
चव असते ग खास
चूल पेटली ओढीने
धग त्याची जीवनात
कवा मिळेल भाकरी
भूक लागे अतोनात
चूल पेटता पेटली
मन माझे आनंदले
तुझ्या हातची भाकरी
सुख अंतरी पावले
वात्सल्याचा झरा आई
किती गोड लागे पाणी
तुझ्या डोळ्यातले भाव
तृप्त झालो ग जीवनी