STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

भाकरी

भाकरी

1 min
445

भाकरीचा चंद्र शोधण्या

सकाळपासून मी वणवण फिरतो।

मिळेल ते कष्ट करोनि मी

पोट घरच्यांचे भरवतो।


ताटात तो चंद्र पाहून

खुश मी होतो कधी

मिळवलेली असते स्वकष्टाने

चतकोर अर्धी मीच माझी।


वाढलेली पूर्ण खातो

अन्न हे पूर्णब्रम्ह समजोनी।

दे असेच सुखाचे दोन घास

मागतो देवास हात जोडोनी।


 उपाशीपोटी बघतात जे रात्री

 चंद्र भाकरीचा आकाशात।

कळतो त्यानाच अर्थ अन आदर

किती महत्वाचा भाकरीचा चंद्र तो

आपल्या जीवनात


Rate this content
Log in