भाकर
भाकर
1 min
12K
भाकरीचा तुकडा
त्याचसाठी चंद्र होता
एका तुकड्यापाई
अख्खा दिस गेला होता
स्वतः पाणी पिऊन
भाकर पोरांना भरवली
त्यांचा आनंद पाहून
भूक त्याची भागली
उद्याची स्वप्ने घेऊन
झोपी तो गेला
पोरांना बाप त्यांचा
देवा सारखा वाटला
एका भाकरीने शिकवलं
जगायचं कसं असत
जवळ काही नसलं
तरी जगणं हरायचं नसतं