भाग्यविधाता
भाग्यविधाता
1 min
199
मीच माझा शिल्पकार
माझे हे कर्म विधान
भाग्य हे मी घडविले
वाट ही ध्येय प्रधान
हात माझे कारागीर
श्रम माझी हीच शक्ती
उद्देशाचे रक्त धावे
कामा प्रती हीच भक्ती
पायवाट ही चालतो
मन माझे हे खंबीर
श्रद्धा आहे सेवेप्रती
झिजवून चंदन शरीर
माझा मी भाग्यविधाता
आत्मशक्ती हेच धन
मार्ग हेच ध्येयाप्रती
आशा दाखवितो मन
ऋण माझे फेडण्यास
देऊ घामाचे हे मोती
रक्त देहाचे जाळून
पेटविला देह ज्योती
