STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

बगळे

बगळे

1 min
186

पाहून आकाश काळे, निळे

संथ गतीने उडतात बगळे

दिसताच पाण्याचे, स्वच्छ तळे

मनाला त्यांच्या, आनंद मिळे //१//


उतरतात सगळे, तळ्याच्या काठी

मासे खाण्यासाठी, करतात दाटी

एक पाय करूनी वरी

माशांना वाटते, साधुबुवा कोणीतरी//२//


गर्दी होता माशांची

चलबिचल, होते बगळ्यांची

साधूचे ढोंग, करून मनात

उचलतात मासे, एकाच क्षणात//३//


अशी होते फसवणूक माशांची

बगळयांना कसली पर्वा त्यांची

होता त्यांचे पोट भरून

बसतात सगळे, पंख सावरून//४//


इकडे, तिकडे मान हलवतात

सगळीकडे टक लावून बघतात

आहे बगळ्यांची, गंमतच न्यारी

उंच, उंच मारतात भरारी. //५//


Rate this content
Log in