बघू नकोस...
बघू नकोस...
1 min
412
बघू नकोस किनारा
सागर तळाशी जाऊन ये
तुझ्याचसाठी दडलेल्या मोत्यांना
जवळून जरा पाहून ये....
बघू नकोस चेहरा
खोलवर मनांत जाऊन ये
तुझ्याचसाठी वाहणारा
प्रेमाचा झरा
ओंजळीत तू घेऊन ये...
बघू नकोस अंबरात
उंच भरारी घेऊन ये
तुझ्याचसाठी चमकणारा
तारा डोळ्यांत साठवून ये...
बघू नकोस डोळ्यांत
स्वप्नांत तू जाऊन ये
तुझ्याचसाठी वाहणाऱ्या
अश्रूंना हळूवार हाताने
पुसून ये
बघू नकोस वाट आता
प्रेम तुझं जाणून घे
तुझ्याचसाठी थांबली आहे
तिला आता घेऊन ये
