बेंदूरबैल
बेंदूरबैल
1 min
416
आता परत जातो कुरवात
काळी माती घेऊन येतो घरात
लडबडीत होऊन चिकलानं
दोन बैल बनवीन हातानं
दावणीला नाही उभं जनावर
वळचनीला नाही मोडकी नांगर
गवानीत टाकीन खोटा चारा
बांधून मी या दोघांना
साजरा करीन बैलपोळा
या सर्व कल्पना मनात डोकावतात
लहानपण हरवलं पण
जुन्या आठवणी आठवतात
बैलाची दिवाळी साजरी होत असे
रंग लावुन शिंगांना त्यावर गोंडा शोभून दिसे
गावाकडची पिकलेली पाने गळून पडली
सणासुदीची मजाच नाही उरली
काटीचा सारा घेऊन संस्कृतीचा नारा देनारा
शेतकरीवर्गच उरला नाही
सणाचा रंग फिका पडला
