बेजबाबदार
बेजबाबदार
कोरोनासारखा घातक विषाणू
पसरला अवघ्या चराचरावर
हे मानवा घे काळजी स्वतःची
जगायचेय न या वसुंधरेवर...
बाहेर नका पडू कामाशिवाय अगदी
खायला तर आहे न आपल्याच घरी
वेळ तशीच आली जर बाहेर पडण्याची
बेजबाबदारपणा नको दाखवू आता तरी...
वृद्धांच्या लक्षात याचे परिणाम येत नाहीत
मला काय होतेय ऐटीत मिरवतात
घरातल्यांना तर पार धुडकावून लावतात
शासन सांगते तरी हे कुठले हो ऐकतात...
नेहमीप्रमाणे फिरायला जाणार
मास्क म्हणे आम्ही नाही वापरणार
बर आल्यावर हात पाय धुवायला सांगितले तर
हो माहीत आहे आम्हालाच गप्प करणार...
काय करावे हो यांच्या वागण्याला
जगात धुडूगुस घातलाय कोरोनाने
बेजबाबदारीने न वागता आपण सारे
वागूयात ना हो आता तरी शहाणपणाने...
शासनाला त्यांच्या कामात मदत करू
घराबाहेर तर पडायचे नाही इतकेच पाळू
हे मानवा जीवन मिळालेय एकदाच
आपल्या सार्या घरादाराला छान सांभाळू...
