बदलत चेहरा
बदलत चेहरा
1 min
205
किती चेहरा बदलला माणसाचा।
नसावा जणू हा जुना मूळ साचा।।
तपासून पाहे जणू आदि मानव।
जुने छान आहे कि आहे अभिनव।।
बदल काय झाला कळेना कुणाला।
तसे वागणे राहणे एक वाटे मनाला।।
जरी साधली ती गती मानवाने।
बळाने तरी श्रेष्ठ होते पुराणे।।
जुन्यांची नव्यांशीच स्पर्धा नसावी।
न शक्ती, न युक्ती सकळ एक व्हावी।।
