बदला
बदला
1 min
12K
बदला बदला
सवयी तुमच्या बदला
नाहीतर घेईल हा काळची
तुमचा बदला !
शक्यतो वापरु नका तुम्ही लिफ्ट
कुणास ठाऊक हात
किती जणांनी लावले !
जिना ऊतरतांना घेऊ नका
आधार रेलिंग चा
ईथे नका शिवू तिथे नका शिवू
आठवा आजीचे सोवळे
वळा पुन्हा जुन्या सवयीत
येताच घरी ओता पाणी
आपुल्या पायावरी
श्रोत्राचमन आचमन
घ्या काळजी थोडी तरी
विसरु नका शिस्त जुनी
वाचवील तीच झणी
आणाल काहीही बाहेरुन
घ्या आधी नीट धुवून !
बदला बदला
सवयी तुमच्या बदला
नाहीतर घेईल हा काळची
तुमचा बदला !
