बैलपोळा
बैलपोळा

1 min

49
माझी दोनी गुनी बैलं
चालत्याती मैल न मैल
शेत नांगरुनी देती
पाणी मोटेचं वहाती
खतं बी बेनं बाजारी
साथ देती घरदारी
त्ये खळ्यात नाचता
रास मोतीयांची दारी
जत्रंत माज्यासाठी
शर्यतीत बी दौडती
लई पिरेम करताती
आज ओवाळू आरती
खावा पुरणाची पोळी
सर्जा राजाची दिवाळी !