बैलपोळा
बैलपोळा
1 min
157
येतो बैलपोळा
श्रावण अमावस्येला
उरत नाही
पारावर आनंदाला
शेतकरी कृतज्ञता
व्यक्त करतो
ऋण फेडण्यासाठी
बैलं सजवतो
बैलांना असतो
वेगळाच मान
पुरणपोळीचा नेवैद्य
असतो खानपान
सजलेली बैलं
दिसती छान
कामाचा नसतो
त्यांना ताण
दिवसरात्र राबतात
शेतामध्ये झुरतात
धन्याला आयुष्यभर
साथ देतात