बैलजोडी
बैलजोडी
1 min
247
झुंजूमुंजू होता उठे
मालकाच्या असे आधी
कसे रे सांगू गड्यानो
माझी बैल जोडी साधी ||१||
शेता मध्ये जाण्यासाठी
हातात घेताच काठी
मी पुढे पुढे जाताना
मागे येती पाठी पाठी ||२||
सोन केलं लाडक्यांनी
आधी फक्त होती माती
डोळे पाणावूनी आले
बहरली माझी शेती ||३||
संपे दिनचर्या तेव्हा
फिरे परत माघारी
बसवुनिया गोठ्यात
मालकाला हाक मारी ||४||
