बैलगाडी
बैलगाडी
1 min
227
काय सांगू तुम्हां
मजा प्रवासाची
बैलगाडी सवे
केलेल्या यात्रेची १
राजा आणि सर्जा
तालेवार जोडी
त्यांच्यासवे येई
प्रवासाला गोडी २
पाठीवर झुल
मखमली शोभे
राजा सर्जा जणू
दो नंदीच उभे ३
बैलगाडी आहे
खरीच सुंदर
घोंगडी टाकली
दिसे मनोहर ४
छान सजावट
आहे ती केलेली
ताडपत्री बघा
वर टाकलेली ५
असा हा प्रवास
कसा विसरावा
नवीन पिढीला
काय तो कळावा ६
