बैल पोळा
बैल पोळा
झुंजू-मुंजू बघा हो
झाली छान पहाट
सर्जा-राजाची जोडी
दिसती आज गावात
बळीराजाचा सांगाती
आज विसावा घेतो थोडी
खांद्यावर झूल घालून
मिरवतो बैलाची जोडी
बळीराजाच्या मैतरचा
किती सुंदर सोहळा
बैलपोळ्याच्या सणाला
सारे बैल होतात गोळा
नैवेद्यत्वासाठी करते
मालकीण पुरणपोळी
तुझ्याच श्रमाने भरुन आहे
बळीराजाची झोळी
बळीराजाचा मित्र खरा
त्याचं दुःख तूच जाणतो
धन्याला सुख देण्यासाठी
शिवारात अहोरात्र राबतो
तुझ्या कष्टाची आहे
तुझ्या मालकाला जाण
म्हणून आजच्या दिनी
भरभरून देतो तुला मान
सजवून धजवून गावात
तुला आज फिरवतो
गोड पुरणपोळीच्या
नैवेद्याचा घास भरवतो
दोघांच्याही मैत्रीत
रहावी सदैव गोडी
साथ द्यावी बळीराजाला
अशीच सर्जा-राजाची जोडी
