बारा एप्रिल
बारा एप्रिल
सतराव्या दिवसाची सुप्रभात....!
स मंजस पणाचा अभाव
त गमग जीवाची करवितो
रा ईचा पर्वत उगाचच
व्या कुळता मनाची वाढवितो...
दि वसा ढवळ्या नजरे आड होऊन
व ळचणीतला शत्रू डोके वर काढतो
सा रखे आपलेच अस्तित्व
ची रफाड करण्या दाखवितो....
सु जाण झालोत आता आम्ही
प्र तारणा कशी करायची हे जाणतो
भा ग्य आमचे आमच्या हाती
त लवारीचे शत्रूवर घालण्या तुटून पडतो...
तू असलास जरी नजरे आड
करशील जरी हल्ला द्वाड ,पण
आम्ही लक्ष्मण रेषेच्या आत
तुला करता येणार नाही घात....
एकांतवास आमचा सबळ
त्यात सय्यम हा ही प्रबळ
तुलाच येईल रे जाण्याची उबळ
पाहता एकजुटीचे प्रयत्न अंमळ...
आज सतराव्या दिवसाची सुप्रभात
सांगतो ऐक रे तू कानात
तुझे वास्तव्य राहणार नाही दुनियेत
घालतो रे वज्र घाव तुझ्या डोक्यात....
संकल्पे सारे रेखिले
तुझे कौतुक खूप देखिले
विकल्पे पहा कसे रोखले
नष्ट करण्याचे देऊन दाखले..!
