बापू !!
बापू !!
सत्याचा तोचि मार्ग
स्पष्ट मनाचे विचार
अविचारी व असत्याचा
नाही कोणता आधार !!धृ!!
कठोर असे सत्याचा वर्ण तरी
मनावर नाही कोणता हा भार
खोट्याचे हे तत्व बाळगुणी
फसवतो आपल्या तत्वास !!१!!
द्वेष असे मनात जरी
उणीव तिथे हे फार
अहिंसेचे तत्व बाळगू
होई सर्वत्र सुखकर !!२!!
माणूस हा एकच असतो
त्यासी धर्माशी भेदू नका
स्वातंत्र्याच्या काळातही
हिंदू-मुस्लिम ऐक्य विसरू नका !!३!!
कधी हातुन चूक झाली असेल
तर चूक ही आपली माना
दुसऱ्यांवर बोट दाखवण्या अगोदर
सर्वात आधी निष्कर्ष काढा !!४!!
गर्व बाळगा कर्तृत्वाचा
कोणालाही कमी लेखू नका
कधी आपण कमी होतो
हे कधीही विसरू नका !!५!!
स्वच्छता अभियान घेऊन हाती
एक निष्ठेने पूर्ण करू
बापूजींचे स्वप्न आपुल्या
दोन हातांनी पुरस्कृत करू !!६!!
दोन हातांनी पुरस्कृत करू !!६!!
