बापू कुटी
बापू कुटी
आठवणी खरं सांगू का ?
खूपच गोड असतात
काही क्षणापुरतेच पण
घटनास्थळी सहज घेऊन जातात ......
बापू कुटीचेच पहा ना
अगदी मनाजवळचे ठिकाण आहे
बापूंच्या बाबतीत तिथे
खूप छान लिखाण आहेे......
बापूजीच्या प्रत्येक वस्तूचे
आम्ही निरीक्षण करायचे
हात नव्हते लावता येत पण
काचे बाहेरुनच परिक्षण करायचे ......
सुती कपड्यांचा चरका
आम्ही ही चालवून पहायचे
काही काळा पुरते खादी कपड्यांचे
गर्व मनी बाळगायचे.......
बापूंच्या प्रार्थना स्थळी
मन मंत्र मुग्ध व्हायचे
ताला सुरात सारे मिळून
प्रार्थना आम्ही गायचे.....
बापूंच्या प्रतिमेची रांगोळी
खूप सुंदर वाटायचे
असे दर वर्षी 02 ऑक्टोबर ला
आम्ही बापू कुटी गाठायचे......
