बापुजींची काठी
बापुजींची काठी
1 min
201
हाती धरुनी काठी,
केली त्यांनी दांडीयात्रा,
मिठाच्या सत्याग्रहाची,
बरोबर पडली मात्रा!
दांडी गावी दांडी घेऊन
गांधीजींचा उपाय भारी
नि:शब्द आंदोलन त्यांचे
ज्याने गोरा गेला माघारी!
सविनय संघर्ष करावा हे,
तुम्ही जनास शिकवले,
लाठी खाल्ली, न मारली
अन इंग्रजांना येथून हटवले!
