बाप्पा
बाप्पा
गणपतीबाप्पाच विसर्जन केल
घरी आल्यावर बाप्पा बसलेला पाट उचलताना हात जड झाले होते।
लायटिंग काढताना डोळ्यापुढे अंधार येत होता।
भावभक्तीने वाहिलेले निर्माल्य काढून गोळा करताना हात जणू थर थर कापत होते।
डोक्यावर जरीचा फेटा, कानात मोत्याची बाळी, सगळं खूप सुंदर
मनमोहक गणपतीचं रूप होत।
हे सगळं आवरताना मी गणपतीच्या आठवणीत रमून गेले
तेवढ्यात बाहेरून जोरात आवाज आला आमचा शेजारचा गणपती विसर्जनाला निघाला होता म्हणू सगळे जोरात म्हणत होते गणपती बाप्पा मोरया मी हळूच पाणावल्या डोळ्याने म्हणाले, पुढच्या वर्षी लवकर या।
पुढच्या वर्षी लवकर या।
