Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Rohit Khamkar

Others


4.0  

Rohit Khamkar

Others


बाप्पा

बाप्पा

1 min 21 1 min 21

आले दाटून उर, डोळेसुद्धा पाणावले.

असे आलेले बाप्पा, आता असे निघाले.


निरोप शेवटच्या आरतीचा, उल्हासात मिरवणुकीच्या.

पुढच्या वर्षी लवकर या, गजर एका वचनाचा.


सगळ्यांना आवडी मोदक, प्रसाद त्या गणरायाचा.

प्रत्येकाच्या मनीही आहे, बाप्पा माझा मानाचा.


तू शुभंकर मंगल मूर्ती, कीर्ती तुझी तारणहारी.

तू सुखकर्ता तु दुखःहर्ता, तूच घालव ही महामारी.


आले कितीही विघ्न, तरी नित्य सेवेत खंड नाही.

इवल्या इवल्या डोळ्यांनी, तुझेच भव्य रूप ते पाही.


चुकलो असेल काही, माफ कर तुझ्या लेकरानां.

सद्बुद्धी तूच द्यावी, हे देवा श्री गजानना.


पुन्हा वर्षभर चालतील, घराघरात याच गप्पा.

स्वागत करण्या तयार आहोत, तुम्ही लवकर यावे बाप्पा.


Rate this content
Log in