STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

बाप्पा

बाप्पा

1 min
214

असेन मी चार वर्षाची ...होती लगबग घरात गणेश चतुर्थीची ...

मखर सजला होता, रंगीबेरिंगी पताकांनी झालर सोडली होती ...

दिवस आला तो ज्याची मी वाट पाहत होती ...

बाप्पा विराजमान झाला मखरात ...

त्याला पहाताच मन माझे नाचू लागले आनंदात ....

गट्टी जमली आमची छान ...

मी च बोलत असे बाप्पा मात्र गप्प घेई ऐकून...

सात दिवस होता मुकाम बाप्पाचा ...

दर दिवशी बाप्पा ला नेवैद्य असायचा निरनिराळ्या पदार्थाचा ....

बाप्पा चा जाण्याचा दिवस उजडाला ...

तो हि माझ्या रडण्याने सुरु झाला ...

बाप्पा ला न जाण्यासाठी चालला होता माझा अट्टहास ....

कायम ठेवावा वाटत होता बाप्पा आमच्या घरी खास ....

आईने मला समजावले बाप्पा जातो आहे आपल्या आईकडे

त्याला पण तुझ्यासारखी आठवण येत असेल ना आपल्या आईची ...

पण नक्की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येईल ....

जर तू हसत बापाला सांगशील ....

मग मी धावत गेले बाप्पाच्या कानात हळूच सांगितले ...


Rate this content
Log in