STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

बाप्पा पावसा रे ।

बाप्पा पावसा रे ।

1 min
360

बाप्पा पावसा रे ,बाप्पा पावसा रे

ये तू माझ्या नवसा।।धृ।।


नवस माझा रे, भोळा

कापूस पिंजला मळा

करी सिनगार सोळा

पाऊस झेलन्या भाळा।।१।।


टप टप येरे बाबा

नाहू माखू आता बाबा

शेला पदर घे,बाबा

डोई आड आता बाबा।।२।।


काळीभोर तू माऊली

सार्या जगाची साऊली

वरुण देवाची लीला

नदी नाले दुथडीला ।।३।।


अंग अंग भिजण्याची

जणु तूप थिजण्याची

दुपार मोहरण्याची

ती सांज हरकण्याची।।४।।


बिगी बिगी बाप्पा आला

काळजाला छापा केला

झ्याप पाल्याला लागला

नंदी पोहतो नदीला।।५।।


शेती आनंदी डोलते

डवरं वखरं चालते

चवळी उडीद मुंग ते

डोकावून ते पाहते।।६।।


तुर ज्वारी पिकं बरं

औदा आबादानी खरं

पडो तोंडात साखर

आली पावसाची सर।।७।।


Rate this content
Log in