बापावरील अन्याय
बापावरील अन्याय
1 min
333
प्रत्येकजण गात असतो आईचे गुणगान,
पण बाप मात्र राहतो यापासून अजाण.
आईची गायली जाते प्रेमळ अशी थोरवी,
परंतु बापाची दिली जाते व्यसनी अशी महती.
लक्षात राहते आपल्या शिदोरी करणारी आई,
पण शिदोरीची सोय करणारा बाप विसरून जाई.
आई पुरेसी असते छोट्या संकटांसाठी,
मोठी वादळे पेलताना हा बापच आठवी.
का सहन करतो बाप असा हा अन्याय,
आपणच द्यायला हवा बापाला हा न्याय.
