बाप
बाप

1 min

288
बाप माझा कणखर
अष्टपैलू व्यक्तीमत्व,
बापामुळेच या जगी
आहे माझे हे अस्तित्व...॥१॥
बाप माझा भासे जसा
कठोर नारळावाणी,
कष्टाळू, खंबीर पण
आतून प्रेमळ पाणी...॥२॥
बाप माझा मुलांसाठी
करी कष्ट रात्रंदिस,
इच्छा पूर्ण व्हाव्या सर्व
फक्त एवढीच आस...॥३॥
बाप माझा वाटे मला
जशी चंदनाची काया,
झिजूनी जाई सदैव
देतात प्रेमळ माया...॥४॥
बाप माझा खूप भोळा
थोर त्यांची ही पुण्याई,
ऋण नाही फिटणार
कसे होऊ उतराई....॥५॥