STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

बाप..!

बाप..!

1 min
332

बाप बाप असतो

घरोघरी त्याचा

व्याप असतो


घरा-दारात

त्याचा खरा

धाक असतो


आईचा त्यांना

लटका राग असतो

तोच तिचा साज असतो


पोरांचा तो

आदर्श असतो

तरीही तो नकोसा वाटतो


एकाच फाटक्या

धोतराला सारख्या

गाठी मारत असतो


गाठी मारता मारता 

जीवनाची साठी 

गाठत असतो


त्याच्या गाठीत

आठवणींची शिदोरी

उर्वायुष्यासाठी साठवत असतो


आठवणीवरच

उरल सुरलं जीवन

आनंदाने जगत असतो


दरवाजाकडे टक

लावून पाखरू

येण्याची वाट पाहात असतो


आवंढा गिळून

कोरडे उसासे टाकून

मनाची समजूत घालत असतो


आणि आपल्याच

पिलांचे भाग्य

शेवटपर्यंत आखत असतो


बाप होण्याचे

हे एकच कर्तव्य

तो जन्मभर पार पाडत असतो


बापाचं जीणं

इतकं सोपं नसतं 

मुलांना ते कोठे कळतं


तारुण्याच्या धुंदीत

बापाचं ओझं होतं

ते बापालाही कळतं


पण पितृप्रेम

आंधळं असतं

म्हणून सदा त्याचं काळीज फाटतं...!!


Rate this content
Log in