बाप
बाप
का रडला बाप तुझा
तुला कळणार नाही
निष्ठुरच दिसतो तो तुला
डोळ्यामगिल अश्रू तुला
कधी दिसणार नाही
मायेने फिरवलेला बापाचा हात
तुझ्या गाळाला बोथट वाटतोय
दिवस रात्र राबतो तो तुझ्यासाठी
त्याच्या मायेचा अंत तुला कळणार नाही
का रडला बाप तुझा
तुला कळणार नाही
एखादा हट्ट तुझा पुरवला नाही
म्हणून का तो बाद ठरतो
दमून आलेला बाप जरासा रागावला
म्हणून का तो नालायक ठरतो
का रडला बाप तुझा
तुला कळणार नाही
तुझ्या गालावर दिलेले एक चापट
त्याला दिवस भर बोचून काढते
पण स्वतःलाच मारत राहतो कित्येक दिवस
चूक झाली माझी म्हणून तो स्वतःलाच कोशात राहतो
का रडला बाप तुझा
तुला कळणार नाही
उठाठेव किती करावी त्याने
त्याचा उठाठेविला अर्थ कोण देतो
तुला माहीत आहे का रे बाळा
तो काय काय उलाढाली करतो
का रडला बाप तुझा
तुला कळणार नाही
