STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

बाप🙏🙏

बाप🙏🙏

1 min
424

लांबुनी बघून जन्मलेल्या बाळा

अंनदाश्रूं भरता डोळा।

न दिसे प्रेम त्याचे

कधी कुणाला।

कधी कुणाला।

कौतुकाने तोंड गोड 

करण्या त्याची धडपड।

बघे दुरून बाळाच्या आईला

करी स्मित हस्य ते प्रेमळ।

आईची माया दिसे सर्वांना

प्रेम तिच ओसंडून वाहे।

डॉ. केबिनमध्ये जाऊन

बाळ आणि बाळाच्या आईची

सुखरूपतेची करे विचारपूस

गोठलेल्या आसवांना वाट 

मोकळी करू पाहे।

घेता बाळाशी छातीशी

प्रेमे धरे कवटाळून।

पाहून रूप ते गोजिरे

सगे सोयरे करती कौतुक

देऊन शुभेच्छाचे 

शब्दरूपी गजरे।

असा हा आनंद गगनात

मावेना।

आई बाप झाल्याचा आनंद गगनात मावेना।

आनंद गगनात मावेना।



Rate this content
Log in