बाप
बाप
1 min
245
ओल्या मातीत राबतो
रक्त आटवितो बाप
रात्रंदिन करी कष्ट
पुण्यवान माझा बाप //१//
माया बापाच्या नशिबी
काळया मातीत राबणं
राब राबूनं शेतातं
अन्न धान्यं पिकवनं //२//
ऊन पावसाची पर्वा
नाही केलीया बापानं
वावरात त्याचा ठिया
करी शेताची राखणं //३//
बाप पिकवतो पीक
घाम गाळून शेतात
तवा पडतात राशी
माया बापाच्या घरात //४//
काळी कसदार माती
जगवते सगळ्यांना
नाही पडायचं कमी
पोटभर सगळ्यांना //५//
खरा जगाचा पोशिंदा
माझा शेतकरी बाप
माझ्या बापाच्या कष्टाचं
नाही होत मोजमाप //६//
