STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

3  

Kiran Ghatge

Others

बाप

बाप

1 min
11.7K

खटल्याचं घर चालवताना 

बाप माझा एकटाच खपत होता.

स्वताःला खपवून घेता घेता 

आम्हाला मात्र जीवापाड जपत होता.


संसाराचा गाडा हाकताना,

तो नेहमीच आनंदी असायचा.

येणार नाही लेकरांच्या डोळ्याला,

पाणी म्हणून दिस रात राबायचा.


दुरुनच दिसला कि पळापळ व्हायची 

भिती वाटायची जेव्हा तो रागवायचा 

प्रेम असायचं त्याचं अफाट 

जेव्हा तो आमचे सगळे हट्ट पुरवायचा


माय गेली देवाघरी तेव्हा,

तोच आमची माय झाला होता. 

मायेचा प्रत्येक धर्म त्याने,

नित्यनेमाने जपला होता.


आलेल्या प्रत्येक संकटाशी,

तो प्राणपणाने लढला होता.

संकटांशी लढता लढता त्याने,

आमचा हात कधी सोडला नव्हता.


तुमच्या संस्कारांची किंमत,

आज पावलोपावली कळते आहे.

थोडे अडखळलो असलो तरी,

पण स्वाभिमानाने जगतो आहे.


Rate this content
Log in