बाप
बाप
1 min
189
राब राब राबतो जो आपल्यासाठी रोज
काबाड कष्टाची करत असतो नवी खोज
घाम गाळून उन्हात जीव दमवत असतो
मुलांसाठी त्याच्याजवळ पर्याय नसतो
थकून भागुन येऊन मुलांजवळ रमतो
सारे दुःख विसरून त्यांच्यामध्ये खेळतो
जीवावर खेळून तो घाबरला ना कधीच
त्यांच्या पाठीशी तो उभा असतो आधीच
डोळ्यातले अश्रू कधी समोर पाडत नाही
बाहेर जाऊन एकट्यात रडून घेतो कसाही
खिश्यात नसते दमडी तरी खाऊ घेणार
मुलांची भूक तो कधीच नाही मारणार
उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी
खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी
