बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
1 min
238
बाप माझा ग्रेट आहे
त्याच्यामुळेच मी आहे
माझं तो सर्वस्व आहे
बाप माझा हो ग्रेट----
आहे तो भला माणूस
नको त्याला दुखावूस
त्याला दे दिर्घ आयुस
त्याला सुखी ठेव ----
तो संस्काराची शिदोरी
करतो मोलमजुरी तो शेतकरी
देतो सुख घरीदारी
बाप माझा महान----
तो आहे देवमाणूस
खोडी नकोरे काढूस
खिल्ली नको उडवूस
तो माझा आदर्श रे----
घरासाठी राबतो रे
घरासाठी झिजतो रे
कष्टाने मिळवतो रे
मीठ भाकर गोड----
तो एक बाप माणूस
स्वभावाने तो सालस
घराचारे तो कळस
राब राब राबतो----
नेहमी उद्याची चिंता
बाळासाठी खातो खस्ता
उगीच खर्च नसता
करत नाही रे बाप माझा
