बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
माझा स्वाभिमान बाप माझा शेतकरी असल्याचा
कष्ट करुनी पोट भरतो साऱ्या जगाचा
त्याला साऱ्या जगाचा घोर
म्हणून भाकर खाई कोरभर
रात दिस मेहनत करतो
भाकर कष्टाचीच खातो
पोचतो ही दुनिया सारी
बाप माझा शेतकरी.....||ध्रु||.....
माझा स्वाभिमान बाप माझा शेतकरी असल्याचा
कष्ट करुनी पोट भरतो साऱ्या जगाचा
जग म्हणतो व्यापारी लोकांमुळे देश चालतो
पण आज मला lockdown मुळे कळलं तरी
जेव्हा शेतात नांगर घेवून झिजतो शेतकरी
तेव्हा देश चालतो हरणा परी
बाप माझा शेतकरी....||१||....
माझा स्वाभिमान बाप माझा शेतकरी असल्याचा
कष्ट करुनी पोट भरतो साऱ्या जगाचा
शेतीसाठी हा घरावर कर्ज काढी
कर्जा साठी जाई सावकाराच्या दारी
निसर्ग ही कधी कधी वर्षा करी भारी
शेतातील पिकांची सर्व नासाडी करी
सरकार सुद्धा वेळेवर मदत न करी
शेवटी शेतकरी मात्र आत्महत्या करी
बाप माझा शेतकरी.....||२||.....
माझा स्वाभिमान बाप माझा शेतकरी असल्याचा
कष्ट करुनी पोट भरतो साऱ्या जगाचा
कुठे सेलिब्रेटी आले की लोक गर्दी करी
अरे खरा सेलिब्रेटी तर शेतातला शेतकरी
पांढऱ्याशुभ्र कपड्यातील राजकरणी बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील ईमानदारीचा शेतकरी रंग खरा
रात दिस कमळाच्या फुला परी चिखलात मरी
बाप माझा शेतकरी.....||३||....
माझा स्वाभिमान बाप माझा शेतकरी असल्याचा
कष्ट करुनी पोट भरतो साऱ्या जगाचा
कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता
इतरसाठी जो आपले संपूर्ण आयुष्य झिंजवतो
तोच तर खरा आपल्या जगाचा अन्नदाता
नसे कवळी मोलाची किंमत त्याला जरी
त्याच्याच कष्टाचं खाती दुनिया सारी
बाप माझा शेतकरी......||४||.....
