STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

बाप आणि लेक

बाप आणि लेक

1 min
5.1K

बाप आणि लेकीच्या प्रेमाची 

कुणी करू शकत नाही गणती 

ती तर असते बापाच्या हृदयात 

सतत तेवत राहणारी पणती.......


बापाच्या घरात राज करणारी 

असते ती घरातली राणी 

ज्याच्या दारी जन्म लेकीचा होतो 

तो बाप असतो खरा धनी.......


लेकीचा जन्म होता क्षणीच 

बापाचाही पुनर्जन्म होतो 

डोळे भरून पाहत लेकीला 

हृदयातून माय म्हणून हाक देतो........


लक्ष्मीच्या पावलांनी येते 

लेक ही बापाच्या अंगणात 

लेकीची जागाच असते

बापाच्या हळव्या मनात......


जन्मापासूनच असते ती 

अगदी प्रेमळ आणि गुणी 

शेवटच्या श्वासापर्यंत लेकंच

बापाच्या मायेची ऋणी......


बाप हा असाच वरून सर्वांना 

खूपच कडक व सक्त दिसतो 

पण फक्त लेकीच्या सुखासाठी 

तो बाप कुणा समोर ही झुकतो......


लेक सासरी जात असताना 

बापंच होतो सर्वात जास्त दु:खी 

लेकीसाठी वाटेल ते करतो 

अपेक्षा फक्त, दिल्या घरी रहावी ती सुखी.......


Rate this content
Log in