STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

बालवाडी

बालवाडी

1 min
401

अफाट, विशाल विचारांच्या जाळ्यात

आठवणी करतात येऊन कानगोष्ट

बालपणाच्या टप्प्यात जगले जें काही

धूसर जाहले सारे ना सांगत कोणी स्पष्ट .....


प्रथमच विरह घराचा, आईचा

देतो संकट आभाळाइतके मनावर

बालवाडीचा दिवस पहिला तो

आठवतो का कुणाला आजवर .....


अंतःकरणात मम वलय सयिन्चे

चित्रण होते क्वचितच तयाचे

बाई आठवतात मजला आजही ज्यांनी

गिरवून घेतले धडे पाटीवर आयुष्याचे ....


हेच किस्से तुमचे, माझे, सगळ्यांचे

बालपणीचे बालवाडीचे गमतीचे

कल्लोळ, रडारड वातावरणात नुसता

मन निरागस कोमल करत नाही चिंतन भविष्याचे


Rate this content
Log in