बालवाडी
बालवाडी
आठवतो तो फुलाचा फ्रॉक घातला होता त्या दिवशी
होती छोटीशी वॉटर बॅग गळ्यात आणि बाहुलीचे दप्तर पाठीशी
इवलेशे माझे बोट आईने धरले होते घट्ट हातात
आणि माझी स्वारी निघाली बालवाडीच्या दारात
बालवाडी पोहोचताच पहिले तर कोणी रडत होत कोणी हसत होत कोण पेंगत होत
त्या सगळ्यांना पाहून मला मात्र विचित्र वाटत होत
आईने माझा हात सोडला आणि निघाली घरी
तिला जाताना पाहताच फुटली माझी अश्रूंची झरी
बाईने हातात दिली डोळे लुकलुक करणारी बाहुली जेव्हा लागले मी रडू
तिला पहाताच माझे मन गेले तिच्यात रमून
तेवढ्यात बाईनी आम्हाला शिकवली कविता
आम्हाला हसवत हावभाव करता
मग आम्हाला तिला गोड शिरा
तो मग मी पटकन गिळला
मग मात्र आठवण येऊ लागली आईची
मला घाई लागली घरी जाणायची
बालवाडी सुटली एकदाची
आईला पाहून मी धाव घेतली दाराकडे एकदाची
