बालपणीची मैत्री
बालपणीची मैत्री
बालपणीची मैत्री होती
आमची सुंदर छान।
कुणी नव्हतं भाव खात
कोणाला लागत नव्हता मान।
निस्वार्थी मन होत वस्तूची
देवाण घेवाण चालायची ।
मैत्रिणीला शिक्षा झाली की
जीवाची घालमिल व्हायची ।
आनंदीत चेहरे होते
खेळ होते अंगणातले।
प्रत्येक जण हक्काने एकमेकांना
दुःख सांगायचे मनातले।
आता मोबाईल शिवाय
कोणाला काही सुचत नाही
आईने ठेवला खाली कीं
मुलाना उचलून घ्यायची घाई।
मित्राला आता शिक्षा झाली की
मनातून उकळ्या फुटतात।
फार शान पट्टी मारायचा म्हणून
मित्र गालातल्या गालात हसतात।
रक्त झाले पांढरे आता
माया कोठे राहिली नाही ।
आमच्यासारखं बालपण आता
कुठे शोधून सापडायच नाही।
आठवण आल्या बालपणाच्या
की आम्ही मनात खुदकून हसतो।
पुन्हा नव्याने जोमाने लगेच
उत्साहाने कामाला लागतो।
