बालपणीचा पाऊस
बालपणीचा पाऊस
1 min
199
पहीला पाऊस आला
माझ्या जीवनात जेंव्हा।
होते लहान बालिश
पावसाला घाबरत होते तेंव्हा।
वाजे आभाळ जोरात
होई विजेचा कडकडाट।
वाढे काळजाचे ठोके
अन भीती दाटे मनात।
होई कावरी बावरी नजर
त्यात दिसे इंद्रधनुष्य सूंदर।
रंग मोजता सात
जाई नभाकडे इवलेशे हात।
होडी करून कागदाची
पाण्यात ठेऊनिया दिली।
कदाचित तिच्यात बसुनी
माझी भीती दूर गेली
माझी भीती दूर गेली
