बालपणीचा काळ🙏
बालपणीचा काळ🙏
1 min
211
अजूनही वाटत मला
बालपणच हवं
नसतो कसला ताण
नको कसला मान ।।१।।
आईच्या कुशीत शिराव
पदराच्या पांघरूनखाली झोपावं
मांडीत आईच्या झुलाव
पदराआड लपाव ।।२।।
नाही कोणाला बोलायचं
बघूनच गालातच हसायचं
रडून रडून हट्ट पुरवायचा अन
स्वतःच रुसून बसायचं ।।३।।
वडिलांच्या खांद्यावर बसून
देवाचे दर्शन घ्यायचे
मग ज्याच्या खांद्यावर बसलो
तेच माझे देव असायचे।।४।।
कधी कधी मग अस मला
बालपण माझं आठवत
व्हावे लहान अस मला
बऱ्याचदा मनातून वाटत।।५।।
